मेकिंग महाराष्ट्र – बारामती शहरातील मेडिकल कॉलेज रोडला असलेल्या मेहता हॉस्पिटल समोर रेल्वे ट्रॅक खाली सापडून एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला आहे .यामध्ये महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून. महिलेचे वय वर्ष अंदाजे 35 असल्याचे समजते या प्रकरणी बारामती शहर पोलीस घटनास्थळी जाऊन सदर घटनेची माहिती घेत असून महिला कुठे जात होता कुठून आली होती या सर्व घटनेचा तपास करीत आहेत.तरी सदरील घटना ही आज दुपारी एकच्या सुमारास घडली असून बारामती दौंड रेल्वे खाली हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.