मेकिंग महाराष्ट्र दि १७-: पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतत विविध बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, अधिवेशन, इ. कर्तव्यावर तैनात असल्याने पोलीस अधिकारी/अंमलदार समवेत त्यांचे कुटुंबीय देखील ताणतणावामध्ये असतात.यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयासोबत आनंदाचे क्षण व्यतित करता यावेत व उत्साहाचे वातावरण मिळावे यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतुन तरंग- २०२५ हा मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि.१५/०२/२०२५ रोजी मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होते.या कार्यक्रमाचे प्रायोजक पुनित बालन (पुनित बालन ग्रुप) हे आहेत.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,तसेच राज्यमंत्री नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमांतर्गत ‘अजय अतुल लाईव्ह’ संगीत रजनी हा मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आलेला असून बॉलिवूड व मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमास पुणे शहरातील सर्व शांतता कमिटी /मोहल्ला कमिटीचे सदस्य व इतर महत्वाचे व्यक्ती तसेच सर्व प्रिंट व इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक व प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये बारामती शहरात काही वर्षांपूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहत होते ते श्री.गणेश इंगळे यांची बदली पुणे शहर येथे.सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आणि याच कार्यकाळात या वर्षभरात पुण्यातील गुन्ह्याचे परिवेक्षण करून तपासी अधिकारी यांच्याकडून जवळपास 47 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १३ कोटी रुपयांचा मुद्देमाल तसेच 15 पिस्टल आणि 25 कारतुस हस्तगत केली म्हणून त्या साठी श्री.गणेश इंगळे साहेब यांचा सन्मान करण्यात आला आहे. अशा जिगरबाज आणि शूर अशा पोलीस अधिकाऱ्यांना आमचा सलाम…
