मेकिंग महाराष्ट्र बारामती -दि १८. बारामती शहरात राहत असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाला एका महिलेकडून ब्लॅकमेल करत व खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जवळपास ४ लाख ४९ हजार ६०० रुपयांची खंडणी स्वरूपात काही रोख रक्कम व डायमंड मंगळसूत्र घेतल्याचे फिर्यादी कडून सांगण्यात आल्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे घटनेची सखोल चौकशी करून आज रोजी एका 38 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी गणेश पवार. हे एक मोठे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असल्याचे समजल्यानंतर पवार यांची मैत्री करून त्यांना कट रचून वेळोवेळी धमकवण्यास सुरुवात केली.आणिम आरोपी महिला वेळोवेळी पैशाची मागणी करत गेली त्यावर पवार यांनी तब्बल रोख स्वरूपात २ लाख ८१ हजार ६०० रुपये महिलेकडे दिले आणि ते महिलेने स्वीकारले देखील असे फिर्यादी कडून सांगण्यात येत आहे तसेच डायमंडचे मंगळसूत्र हि घेतल्याचे बारामती शहर पोलिसांना सांगितले यावरून आज मध्यरात्री च्या सुमारास बारामती शहरातील सध्या.. मळद या गावांमध्ये राहत असलेल्या आणि मुळगाव.आझादपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील असलेल्या 38 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार.खाडे हे या घटनेचा तपास करीत आहे