मेकिंग महाराष्ट्र बारामती -दि २९ .बारामती मध्ये सोनसाखळी चोरून दोन चाकी वाहनावर पळून जाणाऱ्या चोरांना बारामती शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस श्री अक्षय सिताप यांनी अगदी धाडसाने पकडले असून असे धाडस कोणी करू शकत नाही. जीवावर बेतणारे धाडस पोलीस कर्मचारी अक्षय सीताप यांनी करून चोरांना पकडून दाखवले.मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील एका महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र चोरून हे चोर जुन्या मोरगाव रोड या दिशेने. निघाले होते त्यानंतर मध्येच एकाची गळ्यातील सोन्याची सोनसाखळीची दुसरी चोरी करून त्यांनी दोन चाकी वाहनावरून निसटण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस कर्मचारी अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच सिताप यांनी चोरांचा पाठलाग केला आणि अगदी सीतापीने त्यांना पकडले आहे. संबंधित चोरांना बारामती शहर पोलीस स्टेशन येथे घेऊन जाण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी जागरूक राहणे किती गरजेचे आहे.हे यातून दिसत आहे. गुन्हा करणाऱ्यांना गुन्हा करण्यापासून रोखले पाहिजे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अशा धाडसी कर्तुत्वाला सलाम”””बारामतीत पोलीस कर्मचारी अक्षय सिताप यांचे कौतुक होत असून अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठांनी या घटनेची दखल घेणे गरजेचे आहे.!