मेकिंग महाराष्ट्र – पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर काल त्यांनी पदभार स्वीकारला .यापूर्वीचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नती अपर पोलीस आयुक्त पुणे शहर पदी नियुक्ती झाली रिक्त झालेल्या जागेवर संदीप सिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली.सध्या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणारे संदीप सिंग गिल हे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून परिचित आहेत.पुणे शहरातील कोयता गॅंगला वडणीवर आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. आज त्यांनी प्रथमच बारामती शहर पोलीस स्टेशन येथे धावती भेट देऊन एक पत्रकार परिषद घेतली व अनेक गुन्ह्या संदर्भात तसेच अनेक समस्या संदर्भात माहिती घेतली यावेळी उपस्थित असलेले बारामती शहर चे व तालुक्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार,Dysp डॉ. सुदर्शन राठोड , बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, यांच्यासह आसपासच्या गावांमधील सर्वच पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. पत्रकार परिषदेमध्ये अनेक विषयांवर चर्चा देखील झाली पत्रकारांनी गिल यांना बरेच काही बारामतीतील समस्यांबाबत प्रश्न विचारले, यावर आता जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी संदीपसिंग गिल कशाप्रकारे प्रयत्न करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.!