मेकिंग महाराष्ट्र – बारामती प्रशासकीय भवन येथे भवानीनगर साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर निकालाबाबत मतमोजणी सुरू असताना जय भवानी पॅनलचे पृथ्वीराज चाचक हे काही कार्यकर्त्यांना घेऊन मत मोजणीच्या आवारात गर्दी करून बसले होते. यावेळी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे आपले कर्तव्य बजावत त्या ठिकाणी गेले व सर्वांना सांगितले की मत मोजणी केंद्राच्या परिसरातून 100 मीटर बाहेर जा या ठिकाणी गर्दी करू नका दंडाधिकारी यांचे मनाई आदेश लागू असून आपण शंभर मीटर अंतराच्या बाहेर जावा यावर जय भवानी पॅनलचे पृथ्वीराज जाचक त्या गर्दीच्या ठिकाणी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक नाळे असे का म्हणाले यावर पृथ्वीराज जाचक चांगलेच भडकले आणि त्यांनी नाळे यांना प्रतिउत्तर देत शेतकरी हे मालक आहेत त्यांना तुम्ही हाकलता का,,असे म्हणत पोलीस निरीक्षक नाळे यांना सुनावले आणि धमकावत आरे, कारे” ची भाषा केली.आम्हाला लॉयन ऑर्डर सांगता का असे म्हणत.? पोलीस निरीक्षक नाळे यांना अपमानित केले..यावरून असे दिसून येते की पृथ्वीराज जाचक हे कायद्याला मानत नाहीत का,,? जाचक यांच्या वर्तणुकीतून असे दिसून येते की “हम करे सो कायदा…..
,,,छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणी दरम्यान पृथ्वीराज जाचकांनी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना वापरलेली भाषा अंत्यत निषेधार्ह असून एकप्रकारे कायदा सुव्यस्थेला दिलेले आव्हानच आहे.मतमोजणी हि एक अत्यंत संवेदनशील आणि शिस्तबद्ध प्रक्रिया असते, ज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पोलीस प्रशासनाला काटेकोरपणे अंमल करावा लागतो.पोलीस आपले कर्तव्य पार पडत असताना त्यांच्या कार्यात अडथळा आणणं किंवा त्यांच्यावर दबाव टाकणं हा गुन्हा आहे. जाचकांनी केलेली अरेरावी ही त्यांची असहिष्णुता,अहंकार आणि त्यांना चढलेली सत्तेची नशा याचे दर्शन घडवते.गेले कित्येक वर्षे समाजकारण राजकारणात सक्रिय असणाऱ्या पृथ्वीराज जाचकांसारख्या जेष्ठ नेत्याला अशी भाषा न शोभणारी आहे….
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार – शुभम अहिवळे