विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर.!

मेकिंग महाराष्ट्र – दि २५. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत अधीक्षक (प्रशिक्षण) पदावर कार्यरत सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते.२५ वर्षांच्या सेवेत फुलारी यांना आतापर्यंत भारत सरकारचे अतिरिक्त सुरक्षा पदक, महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक, पोलीस महासंचालकांचे गौरव चिन्ह, स्वर्णजयंती पदक मिळाले आहे. १९९२ मध्ये फुलारी हे पोलीस उपअधीक्षक म्हणून भरती झाले.पहिलीच नेमणूक नक्षलवादी कारवायांसाठी प्रसिध्द असलेल्या एटापल्ली येथे झाली. तेथे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुणे येथे त्यांनी आर्थिक व सायबर क्राइम शाखेत प्रशंसनीय काम केले. आणि सध्या ते कोल्हापूर परिक्षेत्र चे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहत आहे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाला असून.याच उल्लेखनीय कामगिरीबद्दल 26 जानेवारी 2025 रोजी फुलारी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी असलेले विशेष पोलीस महानिरीक श्री.सुनील फुलारी यांचे जिल्ह्यासह सर्वच पोलीस खात्यात आदर युक्त कौतुक होत आहे.

बारामती येथून प्रसिद्ध होणारे मेकिंग महाराष्ट्र या वृत्तपत्राच्या सर्व वाचकांकडून तसेच पत्रकार बांधवांकडून विशेष पोलीस महानिरीक्षक यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *