मेकिंग महाराष्ट्र ( बारामती ).दि १४- मालकी हक्काच्या असलेल्या अकॅडमी विषयी बदनामी करण्याची धमकी देत तसेच अकॅडमी मालकाबद्दल अश्लील व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी मोहसीन पठाण याच्या विरोधात अखेर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दि 4 एप्रिल 2025 रोजी रात्री 08.39 वा पासुन ते दिनांक. 08/04/2025 रोजी सकाळी 09/59 वा चे दरम्यान आरोपी मोहसीन अकबर पठाण राहणार सुर्य नगरी परीसर बारामती जि.पुणे याने फिर्यादीच्या मालकीचा कोचिंग क्लास असून कोचिंग क्लासेस चे नाव ‘एक्सलस सायन्स अकॅडमी’ याबद्दल व फिर्यादीचे मालकाचे अश्लिल तसेच बदनामीकारक असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व व्हाट्सअपवर पोस्ट वायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर दुपारी 14/00वा. चे सुमारास फिर्यादी अकॅडमी मालक हा उर्जा भवन भिगवण रोड येथील लडकत गॅरेज शेजारी असलेल्या वॉशिंग सेंटर बारामती येथे थांबलेला असल्याचे पाहिले आरोपीने त्या ठिकाणी जाऊन पुन्हा अकॅडमी मालकाला धमकावण्यास सुरुवात केली किं “”मी तर आत्ता व्हिडिओ व्हायरल करून तुला एक संधी दिली आहे ,जर तुझा पर्सनल व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करायचा नसेल आणि तू चालवत असलेल्या तुझ्या मालकी हक्काची असलेली अकॅडमीची बदनामी करायची नसेल तर मला 50 लाख रुपये द्यावे लागती अशी मागणी करून आरोपी त्या ठिकाणावरून निघून गेला त्यानंतर फिर्यादीने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे समक्ष जाऊन सदर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला यावरून पोलिसांनी आरोपी मोहसीन पठाण याच्या विरोधात.गु.र.नं. 121/2025 BNS 308(2),308(3) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दाखल अंमलदार म. पो. हवा. गोरे ब.नं. 1387.तसेच तपासी अंमलदार- पोहवा खाडे ब नं 2628 हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे.