मेकिंग महाराष्ट्र – दि १०.बारामती शहरांमध्ये काल रात्री साडेसातच्या सुमारास भिगवण चौक येथे विनोद जाधव या 19 वर्षीय विद्यार्थ्याला डोक्यात दगड घालून आणि हातातील कडा मारून त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. सायंकाळी भिगवन चौकामध्ये विनोद आपल्या वाहनावर जात असताना अचानकपणे विक्रम गायकवाड व रुद्र सूर्यवंशी यांनी विनोद च्या गाडीसमोर वरील आरोपींनी स्वतःकडे असलेली गाडी आडवी लावली आणि मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागले त्याच वेळी, वरील दोन आरोपीं सोबत असलेल्या आनंद सूर्यवंशी ने शेजारीच पडलेला दगड हातामध्ये उचलून, विनोदच्या डोक्यामध्ये घातला आणि हातामध्ये असलेला कडा विनोदच्या उजव्या डोळ्यावर मारून त्याला गंभीर दुखापत केली. या प्रकरणी आरोपी बारामती मधील नेवसे रोड चिमण शहा मळा येथे राहत असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे .१) आनंद शाम सूर्यवंशी २) विक्रांत गोरख गायकवाड ३) रुद्र नवनाथ सूर्यवंशी यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक.५३/२०२५ BNS.११८(१),३५१(२)(३),३(५) या कलमानखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.नाळे करीत आहेत