
मेकिंग महाराष्ट्र बारामती – दि २. बारामती शहरांमध्ये 30 जून रोजी सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास एका वकिलाने 52 वर्षीय मनोहर बोराडे या पडदे विक्रेत्यावर छातीमध्ये टोकदार बाजूने लोखंडी कात्री मारून गंभीर दुखापत केल्याचे समोर आले आहे. संबंधित हल्ला करणारा व्यक्ती हा पेशाने वकील असल्याचे देखील स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे.? तो नोटरीची देखील कामे करतो. असे देखील समजते. फिर्यादी बोराडे यांनी खालील प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून असे सांगितले आहे की. फिर्यादी मोहन भगवान बोराटे वय 52 वर्ष व्यवसाय पडदा दुकान रा. कसबा माळी गल्ली ता बारामती जि पुणे येथे राहत असून माझे स्वामीज होम डेकोर नावाचे पडद्याचे व घर सजावटी वस्तुंचे दुकान असुन ते चालवुन त्यावर आम्ही कुटुंबाची उपजिवीका करतो. माझा मुलगा प्रतिक व त्याचा मित्र श्रेयश शिवाजी ढवळे यांचे मारवाड पेठ बारामती येथील सक्सेस चेंबर्स या बिल्डींग बेसमेंट मध्ये 14 नंबर गाळ्यात आर्कीटेक्स ऑफिस आहे तसेच त्याच्याच शेजारी गाळा नं 12 आणि 13 हा मनोहर निवृत्ती डेंगळे रा. बारामती जि.पुणे यांचे मालकीचा असुन त्याच्या गाळ्याचे समोरुन जाणे येण्यासाठी सार्वजनिक पॅसेज आहे. त्या पॅसेज मधुन माझा मुलगा प्रतिक मोहन बोराटे व त्याचा मित्र श्रेयश शिवाजी ढवळे आणि त्यांचेकडे जाणारे येणारे क्लाइंट हे रोजच ये,जा करत असतात त्या मोकळ्या पॅसेज मध्येच मनोहर निवृत्ती डेंगळे यांनी त्यांची बंद पडलेली झेरॉक्स मशीन,बाकडे,खुर्च्या इत्यादी वस्तु अडथळा होत आहे याबद्दल त्यांना वेळोवेळी आम्ही समजावुन सांगितले परंतु त्यांनी उलट उत्तरे देऊन माझे कोणतही बोलणं न ऐकून घेता मुलास शिवीगाळ दमदाटी करीत असत. परंतु आज या गोष्टीचा खूप मोठा विचित्र प्रसंग घडला आणि दिनांक 30/06/2025 रोजी सकाळी 09/45 वा चे सुमारास सक्सेस चेंबर्स मारवाड पेठ बारामती येथील आमचे गाळ्याजवळ मी तसेच माझा मुलगा प्रतिक व त्याचा मित्र श्रेयश हे असताना शशीकांत विठ्ठल ढवळे व त्यांचे नातेवाईक रोहित बाचल व शेजारील असलेले टेलर दुकानदार नाज टेलर असे सर्वजण आम्ही आमचे शेजारचे गाळा मालक मनोहर निवृत्ती डेंगळे यांना समजावुन सांगत होतो की जाण्यायेण्याच्या कारणावरुन वाद घालु नका कशाला विनाकारण वाद घालत आहात.आणि तुम्ही माझे मुलावर व त्याच्या मित्रावर हात का उचलला अशी विचारणा करत असताना त्यांनी त्यांचे शेजारी टेलर दुकानातील टोकदार लोखंडी कात्री माझे डावे छातीच्या खाली टोकदार बाजुने मारुन डावे छातीचे खाली गंभीर दुखापत केली आणि मला मनाला की तुला जीवे ठार मारेन व शिवीगाळ केली. कात्री लागलेने माझी डावे बाजुचे छातीचे भागातुन मोठ्या प्रमाणात रक्त येवु लागले मला तेथे हजर असलेले रोहित बाचल यांनी माझी एक्टिवा मोटार सायकल घेऊन मला त्याच्यावर बसवले व औषधोपचार करिता डॉ .देशपांडे हॉस्पिटल यांचे निरामय मेडिकल फांऊडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर बारामती येथे तात्काळ अॅडमिट केले. डॉक्टरांनी माझी परिस्थिती पाहिल्यानंतर प्रथम उपचार चालु केले माझे जखमेवर डॉक्टरांनी चार टाके टाकलेले आणि माझा प्राण वाचवला त्यामुळे माझी मनोहर निवृत्ती डेंगळे रा.गुणवडी ता. बारामती जि. पुणे सध्या रा.सक्सेस चेंबर्स मारवाड पेठ बारामती जि.पुणे यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद असल्याचं फिर्यादीने फिर्यादीमध्ये सांगितले आहे संबंधित प्रकरणाबाबत बारामती शहर पोलीस तपास करीत असून आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम.११८(२),३५२,३५१(२),३५१(३) प्रामाणिक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.