बारामती शहरातील दोन गुन्हेगारांना बारामती शहर पोलिसांकडून एक वर्षासाठी जिल्हा तडीपार.!

मेकिंग महाराष्ट्र दि २२ – बारामती शहर पोलीस ठाण्याचे अभिलेख्यावरील गुन्हेगार नामे (१) धिरज रविंद्र पडकर वय ३२ वर्षे (२) तुषार उर्फ चिंट्या मारुती सोनवणे वय २७ वर्षे दोन्ही रा. एस.टी. स्टॅन्डसमोर आमराई बारामती ता. बारामती जि.पुणे यांची एक टोळी असून सदरील इसम हे त्यांचे टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी तसेच आर्थीक फायद्यासाठी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गर्दी मारामारीसह दुखापत, दुखापत या सारखे गुन्हे करीत टोळीप्रमुख धिरज रविंद्र पडकर याने वरील प्रमाणे त्याची टोळी तयार केली असून ते टोळीच्या माध्यमातुन वरील नमुद प्रकारची कृत्ये अव्याहतपणे बारामती शहर व तालुका कार्यक्षेत्रामध्ये करीत आहेत. त्यांनी ते करीत असलेल्या कृत्यास व्यावसायीकतेचे स्वरूप दिलेली आहे. त्यामुळे बरेच बेरोजगार तरूण मुले प्रस्तावित हद्दपार इसम यांना कष्टावीना मिळणारे पैशामुळे त्यांच्या या वाईट प्रवृत्तीकडे आकर्षीत झालेली आहत. त्यांचे या गुन्हयामुळे सर्वसामान्य लोकांचेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यातुन आर्थीक नुकसान होत आहे. त्यांच्या या व्यवसायामुळे वरील टोळीतील इसम हे आर्थीक प्राप्ती करून त्यावर त्यांची उपजिवीका चालवितात. तसेच ते लोकांना शिवीगाळी दमदाटी करून, गंभीर दुखापत करून त्यांची दहशत निर्माण करतात. त्यामुळे त्यांचे वरील कृत्यांना आळा बसावा म्हणुन विलास नाळे, पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड बारामती विभाग, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली वरील इसमांना पुणे ग्रामीण जिल्हयातुन हद्दपार करणेबाबत पाठविलेल्या प्रस्तावावरून वरील दोन्ही इसमांना मा. पोलीस अधिक्षक साो. श्री. पंकज देशमुख सो. पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्हा (पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्द्द्दिसह) व ं फलटण या तालुक्यांचे हद्दितुन १ वर्षाकरीता हद्दपार केले असून वर नमुद इसम हे हद्दपार केलेल्या क्षेत्रामध्ये दिसुन आल्यास नागरीकांनी सदरची माहिती कोणताही संकोच न बाळगता तात्काळ लगतच्या पोलीस ठाण्यास कळवावी असे आवाहन विलास नाळे पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी केले आहे. तसेच, यापुढे गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये करणाऱ्या इसमांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल. नागरीकांनी कोणताही संकोच न बाळगता अशी गुन्हेगारी कृत्ये करणारे इसमांविरूध्द तक्रारी नोंद कराव्यात असे देखील आवाहन विलास नाळे पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी केले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक बारामती श्री. गणेश बिरादार साो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती श्री. सुदर्शन राठोड सो., यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विलास नाळे तसेच अविनाश शिळीमकर ( पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण ), पोलीस उपनिरीक्षक सतीष राऊत, पोलीस अंमलदार सागर जामदार अक्षय सिताप,अमीर शेख, दत्तात्रय मदने, अमोल देवकाते पोलीस अंमलदार महेश बनकर, रामदास बाबर ( स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण ) यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *