इंदापुर पोलीसांच्या सरकारी कामामध्ये अडथळा प्रकरणात आरोपी तानाजी कर्चे यास ३ दिवस पोलीस कोठडी.!

मेकिंग महाराष्ट्र दि २९- इंदापुर नारायणदास कॉलेज गेटवरती समोर दुपारी काही टुकार मुले दोन चाकी मोटर वाहनांच्या दूर कांड्यांमधील पुंगळ्या काढुन वाहने रेस करीत आहेत व गोंधळ घालत आहेत. अशी तक्रार तेथील नागरिकांनी डायल ११२ टोल फ्रि नंबरला दुपारी कळविली होती. या परिसरात बस स्टॅन्ड,आय कॉलेज असल्याने मोठया प्रमाणात रहदारी असते.त्यामुळे कोणाताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन तात्काळ त्या ठिकाणी वाहतुक अंमलदार वंदना भोंग, पो. कॉ. अकबर शेख ब.नं. ४८२, पो. कॉ. राहुल शिंदे, पो.कॉ. सुहास आरणे व इतरांनी तात्काळ जावुन सदर ठिकाणी पाहणी केली असता तेथे बरेच मुले गोंधळ करीत होते. त्यामुळे त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणत होते. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल महेश साधु रणदिवे ब.नं. ७५५ हे इंदापुर शहरातील कालठाण रोडवरील गेटमधुन पोलीस स्टेशनला घेवुन जात असताना डि.बी. रूमसमोरील जागेत एक इसम काही कारण नसताना त्या मुलांना पोलीस स्टेशनला नेवु नये म्हणुन त्या ठिकाणी मागेपुढे करीत होता व मोबाईलमधुन शुटिंग करत होता हे लहान मुले आहेत ते शाळेतील विदयार्थी आहेत आपण असे काय करता असे म्हणाले असता महेश रंणदिवे यांनी त्याना सांगितले की, सदरची मुले ही नारायणदास शाळा, इंदापुर समोर गाडयांच्या पुंगळ्या काढुन गाड्या चालवुन धिंगाणा घालत आहेत व रस्त्यावरील लोकांना.त्रास देत आहेत त्याबाबत आम्ही त्यांना त्यांचे भविष्याविषयी समजावुन सांगत आहोत असे सांगितले. त्यावेळी त्या इसमाने महेश रणदिवे यांचा रस्ता आडवुन त्यांना म्हणाला की, पोलीसांची दादागिरी जास्त चाललेली आहे, पोलीस अशीच उलटी सुलटी कामे करतात असे म्हणुन मोबाईलमधुन शुटिंग सारखी करत होता. त्यावेळी मी तानाजी कर्चे तुला माहित नाही का मी चांगल्या चांगल्याची जिरवली आहे, तुझी काय औकात आहे असे म्हणुन सरकारी कामात अडथळा आणुन तुझे नाव रणदिवे आहे का, तु महारडया आहे की, मांगटया आहे असे म्हणुन तुझे अंगात खाकी वर्दी आली म्हणुन तुला मस्ती आले आहे का? असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ दमदाटी केली व कॉलर पकडुन त्यांना धक्का देवुन शिवीगाळ दमदाटी केली आहे. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल महेश साधु रणदिवे ब.नं. ७५५ नेमणुक इंदापुर पोलीस स्टेशन यांनी घडलेप्रकाराबाबत तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर इंदापुर पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर ६८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३२, ११५ (२), ३५२, ३५१, ( २ ) सह अ.जा.ज.का. क. ३ (१) (आर) (एस), ३ (२) (व्हीओ), ना.ह.सं.अधि. कलम ७ (१) (ड) प्रमाणे आरोपी नामे तानाजी प्रभाकर कर्चे वय २६वर्षे रा. कौठळी ता. इंदापुर जि. पुणे याचे विरोधात गुन्हा नोंद करणेत आलेला असुन आरोपीस दिनांक २८/०१/२०२५ रोजी अटक करणेत आलेली आहे. आजरोजी आरोपी नामे तानाजी प्रभाकर कर्चे वय २६ वर्षे रा. कौठळी ता. इंदापुर जि.पुणे यास मा. न्यायालय सो, यांनी दिनांक ३१/०१/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास हे मा.श्री.सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग,बारामती हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *