बारामती – अकॅडमी चालकास पन्नास लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपी मोसिन पठाण याच्यावर काही दिवसांपूर्वी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता अनेक दिवसापासून मोसिन पठाण हा फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोसिन पठाण हा हायकोर्टाच्या पायऱ्या देखील चढला परंतु त्या ठिकाणी त्याला दाद मिळाली नाही.आणि त्याचा तिथे देखील जामीन फेटाळला. सविस्तर… अकॅडमी चालकास , त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागितले प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी फिर्यादीच्या फिर्यादीवरून खंडणी मागितले प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोसिन पठाण याला आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माध्यमांमध्ये आलेल्या बातमीवरून चाहूल लागली आणि तो फरार झाला त्यानंतर त्याला काल बारामती शहर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने पठाण याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याचे समजते.या प्रकरणी बारामती शहर पोलीस निरीक्षक नाळे हे पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणी बारामती मध्ये अशी चर्चा सुरू आहे की आरोपीला एका बड्या नेत्याचा “वैयक्तिक सहाय्यक,, अशी कृत्य करण्यास मदत करत होतात ? अशी बारामतीतील नागरिका मध्ये चर्चा आहे ? यामुळे अनेक संशयाच्या बाजू निर्माण होत असून एका अकॅडमी चालकाला बदनाम करण्याचा डाव असल्याचे देखील संशय व्यक्त केला जात आहे.!