मेकिंग महाराष्ट्र पुणे ग्रामीण – पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 21 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश काढले आहेत.कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगणे. दगड, शस्त्रे किंवा अस्त्रे, तसेच ती सोडण्याची किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने सोबत बाळगणे.शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येणारी कोणतीही वस्तू सोबत बाळगणे.कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे,वाद्य वाजवणे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करणाऱ्या कृतीस बंदी आहे.आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणताही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा वर्तनावर बंदी आहे.पाचपेक्षा जास्त लोक जमवणे, मिरवणुकी काढणे यांवर पोलिस अधीक्षकांच्या परवानगीशिवाय बंदी घालण्यात आली आहे.कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.