बदला घेण्यासाठी प्लॅनिंग करणाऱ्या आरोपीला अटक .!

पुणे . शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्लॅनिंग करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई कारवाई केली आहे. शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दाखल असलेल्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून 1 पिस्टल देखील जप्त करण्यात आली आहे. ओंकार सचिन मोरे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याप्रकरणी आरोपी फरार होता. फरार असलेल्या ओेंकार मोरे याला रात्री अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी यापूर्वी शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून एक पिस्टल देखील जप्त करण्यात आली आहे. ओंकार सचिन मोरे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्या प्रकरणी आरोपी फरार होता. फरार असलेल्या ओंकार मोरे याला पोलिसांनी रात्री अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी ओंकार सचिन मोरे हा शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची पूर्ण तयारी करत होता. मोरे सोबत या आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस गांभीर्याने करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *